आर्थिक नियोजन आवश्‍यकच!

मुकुंद लेले
सोमवार, 15 जानेवारी 2018

जीवनातील अपेक्षित व अनपेक्षित प्रसंगांना किंवा अडीअडचणींना सामोरे जाण्यासाठी आधी बचत आणि त्याला योग्य अशा विचारपूर्वक गुंतवणुकीची जोड देणे आवश्‍यक असते. त्यासाठी प्रत्येकाने आर्थिक नियोजन करायला हवे. तसे पाहायला गेले तर आर्थिक नियोजन कधीही करता येते; मात्र असे नियोजन उमेदीच्या काळात केल्यास उद्दिष्टपूर्तीच्या वेळी उत्तम परतावा मिळू शकतो. मेहनतीने कमावलेला पैसा काही पटींनी वाढविण्याचे नियोजन तुम्ही आजवर केले नसेल, तर ‘हीच योग्य वेळ आहे’, असे समजावे.

आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे तुमच्या उद्दिष्टांची सुस्पष्ट व्याख्या करणे. हे उद्दिष्ट घर अथवा मोटारीची खरेदी, मुलांचे शिक्षण, सुटीतील सहलीची योजना किंवा निवृत्तीनंतर आरामशीर आयुष्य घालवणे यापैकी कोणतेही असू शकते. प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी पैशांच्या रूपात मूल्य ठरवणे महत्त्वाचे असते. आज तुम्हाला घर घेण्यासाठी ४० लाख रुपये हवे असतील, पुढच्या वर्षी मोटार खरेदीसाठी ५ लाख रुपये लागणार असतील, पुढच्या दहा वर्षांत मुलांच्या शिक्षणासाठी २० लाख रुपयांची आवश्‍यकता असेल आणि २५ वर्षांनी तुम्ही निवृत्त होताना कदाचित एक कोटी रुपये गरजेचे असू शकतात. आयुष्यातील तुमची अशी उद्दिष्टे आणि त्या तुलनेत तुम्ही सध्या कुठे आहात, हे समजण्यासाठी तुम्ही ही उद्दिष्टे स्पष्टपणे लिहून काढली पाहिजेत. यातील पुढची पायरी म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्टे सुरक्षित राखण्याची! तुम्हाला पुरेसे विमा संरक्षण नसेल, तर तुमचे सर्व नियोजन म्हणजे नशिबाचा कौल अजमावणे ठरू शकते. पुरेसे आयुर्विमा संरक्षण म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट इतकी विमा रक्कम. तीही तुमच्या वयावर अवलंबून असली पाहिजे. याशिवाय कुटुंबासाठी आरोग्यविमाही अत्यावश्‍यक असतो. सध्याच्या काळातील वैद्यकीय खर्चाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तोही पुरेशा रकमेचा निश्‍चित केलेला असावा. थोडक्‍यात, आपल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी आपणच ‘संरक्षक कवच’ निर्माण केले पाहिजे.

Web Title: business news Financial planning