फोल्डेबल आयफोन लवकरच? 

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

न्यूयॉर्क - जगभर लोकप्रिय ठरलेल्या आयफोनच्या डिझाइनमध्ये ॲपलने सातत्याने नवनवे बदल केले आहेत. २०२० मध्ये फोल्ड होऊ शकणारा आयफोन बाजारात आणण्याचे ॲपलचे प्रयत्न असल्याची सध्या चर्चा आहे. ॲपले मात्र या बातमीला दुजोरा दिलेला नसला तरी तज्ज्ञांच्या मते असा फोल्ड होऊ शकणारा आयफोन तयार करण्याचे प्रयत्न ॲपलने सुरू केले आहेत. यासाठी एलजी कंपनीची मदत ॲपल घेऊ शकते. एलजी कंपनीने यापूर्वीच दुमडू शकणाऱ्या स्क्रीन यशस्वीपणे तयार केल्या आहेत. त्यामुळे टॅब्लेटसारख्या मोठ्या आकाराचा आणि स्क्रीन दुमडू शकेल असा आयफोन लवकरच तुम्हाला पाहायला भेटला तर आश्‍चर्य वाटू देऊ नका.

Web Title: business news Foldable iPhone