सोन्याचे भाव वधारले 

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई : जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात घसरण झालेली असतानाही मंगळवारी स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली. सोने प्रतिदहा ग्रॅम ६० रुपयाने वधारले.  साठेबाज आणि किरकोळ ग्राहकांकडून आज सोन्याला मागणी राहिली. यावर जागतिक पातळीवरील भावातील घसरणीचा परिणाम झाला नाही. युरोपीय बाजारपेठेत सोने प्रतिऔंस १ हजार ३१२ डॉलरवर आले. चांदीचे भावही प्रतिऔंस १६.२८ डॉलरवर आले. चांदीचे भाव तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोचले होते. दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्याने चांदीच्या भावातही किलोला ८० रुपयांची वाढ झाली.

Web Title: business news gold

टॅग्स