मागणीअभावी सोने फिके

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

नवी दिल्ली - जागतिक बाजारातील कमकुवत स्थिती व स्थानिक सराफा बाजारातून घटलेली मागणी यामुळे सोन्याचे भाव घटल्याचे चित्र प्रमुख बाजारांमध्ये आहे. सोन्याचे भाव ३५ रुपयांनी घटून ते ३१,८०० रुपयांवर आज आले होते. राष्ट्रीय बाजारातील हे चित्र असले तरी मुंबई सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव ९५ रुपयांनी वाढले होते.

लग्नसराईमुळे सोन्या चांदीचे भाव वाढले होते. राष्ट्रीय बाजारात मात्र चांदीच्या नाण्यांची बाजारातील चलती कमी झाल्याने चांदीचे भावही प्रतिकिलो शंभर रुपयांनी घसरून ३९ हजार ५०० रुपयांवर आले होते. जागतिक बाजारपेठेतही सोन्याचे भाव ०.१४ टक्‍क्‍यांनी उतरले होते. जागतिक बाजारात सोन्याचे भाव प्रतिऔस १ हजार ३४४.९० डॉलरवर स्थिरावले होते. चांदीचे भावही ०.३ टक्‍क्‍याने घसरून प्रतिऔस १६.५२ डॉलर इतके झाले होते. आगामी काही दिवसांमध्ये लग्नसराई सुरू होत असून, सोन्याच्या मागणीत वाढ होईल, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: business news gold price

टॅग्स