सोन्याचे भाव वाढले 

पीटीआय
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात आज प्रति दहा ग्रॅम ५० रुपये वाढ झाली. साठेबाज आणि किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी वाढल्याने सोन्याचे भाव वधारले. याचवेळी औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात प्रतिकिलोला २० रुपये घट झाली. जागतिक पातळीवर आज सोने तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवरून वधारले. अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’च्या पतधोरण आढाव्यातील निर्णयांच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या नफेखोरीमुळे डॉलरचा भाव काही प्रमाणात घसरला. युरोपीय बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ३१५ डॉलर होता.

मुंबई - स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात आज प्रति दहा ग्रॅम ५० रुपये वाढ झाली. साठेबाज आणि किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी वाढल्याने सोन्याचे भाव वधारले. याचवेळी औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात प्रतिकिलोला २० रुपये घट झाली. जागतिक पातळीवर आज सोने तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवरून वधारले. अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’च्या पतधोरण आढाव्यातील निर्णयांच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या नफेखोरीमुळे डॉलरचा भाव काही प्रमाणात घसरला. युरोपीय बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ३१५ डॉलर होता. मागील सत्रांत सोन्याचा भाव १ हजार ३०६ डॉलर या नीचांकी पातळीवर पोचले होते. चांदीचा भाव आज प्रतिऔंस १६.२९ डॉलर होता. 

Web Title: business news Gold prices increased

टॅग्स