सरकारवर ‘जीएसटी’तून धनवर्षाव!

पीटीआय
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारला वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) ‘अच्छे दिन’ आले आहेत. देशभरात ‘जीएसटी’ ही एकच करप्रणाली लागू झाल्यानंतर एका महिन्यात केंद्र सरकारला कररूपाने ९२ हजार २८३ कोटी रुपये मिळाले आहेत. जीएसटीमुळे सरकारवर ‘धन धना धन’ वर्षाव झाला आहे. एकूण करदात्यांकडून जमा झालेला हा कर ६४ टक्के इतका आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी लागू झाल्यानंतर एका महिन्यात सरकारला करातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. केंद्र सरकारला जुलै महिन्यात ‘जीएसटी’तून तब्बल ९२ हजार कोटींचा कर मिळाला आहे. यात १४ हजार ८९४ कोटी रुपये केंद्राच्या करातून मिळाले आहेत, तर २२ हजार ७२२ कोटी रुपये हे राज्यांच्या करातून मिळाले आहेत. शिवाय, एकात्मिक करातून ४७ हजार ४६९ कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. याचबरोबर भरपाई उपकरातून ७ हजार १९८ कोटी रुपये मिळाले आहेत.

सरलेल्या महिन्यात ७२.३ लाख करदात्यांपैकी ५८.५३ लाख करदात्यांनी आपली ‘जीएसटी रिटर्न्स’ भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उशिरा ‘जीएसटी रिटर्न्स’ भरणाऱ्यांना प्रतिदिन १०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

Web Title: business news GST government