मोटार उत्पादक कंपन्यांची ‘जीएसटी’वाढीवर नाराजी

पीटीआय
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबई - आलिशान, हायब्रीड आणि एसयूव्ही प्रकारातील मोटारींवरील जीएसटी सेस १५ टक्‍क्‍यांवरून २५ टक्के वाढविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. मात्र, हा निर्णय या श्रेणीतील सर्व मोटारींसाठी जाचक ठरणार असल्याने वाहन उत्पादकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ‘जीएसटी’नंतर स्वस्त झालेल्या मोटारी सेसवाढीमुळे पुन्हा महागणार आहेत. 

आलिशान मोटारींची बाजारपेठ मर्यादित असली तरी वेगाने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत आलिशान मोटारींच्या विक्रीत सरासरी १० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. या श्रेणीतील मोटारींवर यापूर्वीच जादा कर आहे. त्यात आता जीएसटी २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविल्याने आलिशान मोटारींच्या बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम होईल. शिवाय उत्पादकांना मोटारींच्या किमती वाढवाव्या लागतील. यामुळे विक्रीवर परिणाम होईल, अशी भीती ऑडी इंडियाचे प्रमुख राहील अन्सारी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की सेस वाढविल्याने मोटारींच्या किमतीचा आढावा घ्यावा लागेल. ‘जीएसटी’मध्ये मोटारींचा १५ टक्‍क्‍यांच्या श्रेणीत समावेश होता, मात्र आता तो २५ टक्के झाल्याने कंपन्यांना किमतीचा आढावा घ्यावा लागेल. यात किमती वाढतील. परिणामी ग्राहकांवर परिणाम होईल. कर कमी असल्याने विक्री वाढल्यास करमहसूल नक्कीच वाढला असता. मात्र, आता पुन्हा कर वाढविल्याने करमहसुलालाही फटका बसणार आहे. ऑडीबरोबरच इतर कंपन्यांनी सरकारच्या जीएसटी वाढविण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त केली आहे.

Web Title: business news GST Motor manufacturers

टॅग्स