मुंबई - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी झाल्यापासून घोडदौड सुरूच आहे. शेअरने आज ४०० रुपयांची पातळी ओलांडली होती. आज इंट्राडे व्यवहारात या शेअरने ४१७.६५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या शेअरची आतापर्यंतची ही सर्वोच्च पातळी ठरली. बाजार बंद होतेवेळी हा शेअर ३८५.५० रुपयांवर स्थिरावला.
एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफच्या शेअरची चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय शेअर बाजारात ३१३ रुपयांवर नोंदणी झाली होती. कंपनीने निश्चित केलेल्या रु. २९० या इश्यू प्राइसपेक्षा ८ टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली होती. त्यानंतर सलग तीन दिवसांत शेअर ४४ टक्क्यांनी वधारला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ आणि एसबीआय लाइफनंतर शेअर बाजारात नोंदणी होणारी ही तिसरी आयुर्विमा कंपनी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.