‘आपलं घर महिला हाउसिंग डे’ योजनेला पुण्यात मोठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती’च्या सन्मानार्थ पुण्यातील ‘आपलं घर’ने ‘आपलं घर महिला हाउसिंग डे’ योजना सादर केली. सर्व स्तरांतील पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देत आपले घर बुक केले. 

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती’च्या सन्मानार्थ पुण्यातील ‘आपलं घर’ने ‘आपलं घर महिला हाउसिंग डे’ योजना सादर केली. सर्व स्तरांतील पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देत आपले घर बुक केले. 

या योजनेमध्ये पुण्याच्या चारही दिशांना असणाऱ्या १८ ठिकाणांवर सर्वांना ७.५ लाखांपासूनचे घर बुक करता आले. महिला दिनानिमित्त सादर करण्यात आलेली ‘ती’ लकी ऑफर योजना ग्राहककेंद्रित असून, केवळ ११ हजार रुपये भरून घराची नोंदणी करता येणार आहे; तसेच खास सवलत म्हणून जीएसटी, रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्यूटीसाठी केवळ एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय ‘ती’च्या नावे घर खरेदी केल्यास विविध बक्षिसे दिली जाणार आहेत; तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना २.६७ लाखांचा फायदादेखील मिळविता येणार आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. तसेच काही प्रकल्पांमधील तयार सदनिकादेखील उपलब्ध असून, तेथे गुढीपाडव्याला राहायलाही जाता येणार आहे. उद्योजक महिलांसाठी ‘आपलं घर’च्या प्रकल्पातील तयार व्यावसायिक जागा ‘प्रॉफिट शेअरिंग बेसिस’वर एका वर्षासाठी विनाभाडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लकी ऑफर मिळण्याचे मोजकेच दिवस बाकी असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन ‘मेपल’चे संचालक सचिन अगरवाल यांनी केले आहे.

Web Title: business news home pune aapal ghar women housing day