भारतीय ‘त्रिदेवीं’चा जगभरात डंका

पीटीआय
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

न्यूयॉर्क - भारतीय महिला व्यावसायिकांचा जगभरात डंका वाजू लागला असून, जगभरातील प्रभावी महिला व्यावसायिकांमध्ये भारताच्या तीन महिलांनी स्थान मिळविले आहे. इंद्रा नूयी, चंदा कोचर व शिखा शर्मा यांचा प्रभावी महिलांत व्यावसायिकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

अमेरिकेतील फॉर्च्युन नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यावसायिक महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अमेरिकेतील प्रभावी महिला व्यावसायिक व अमेरिकेबाहेरील प्रभावी महिला व्यावासायिक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. 

अमेरिकेबाहेरील सर्वांत प्रभावशाली महिला व्यावसायिकांच्या यादीमध्ये आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर पाचव्या स्थानी असून ॲक्‍सिस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व सीईओ शिखा शर्मा २१ व्या स्थानी आहेत. 

नूयींचा अमेरिकेतील दरारा कायम
पेप्सिकोच्या प्रमुख व सीईओ इंद्रा नूयी यांनी अमेरिकेतील व्यावसायिक क्षेत्रातील आपला दरारा कायम ठेवला आहे. अमेरिकेतील प्रभावी महिला व्यावसायिकांच्या यादीमध्ये नूयी दुसऱ्या स्थानावर आहेत. जनरल मोटर्सच्या प्रमुख व सीईओ मेरी बर्रा नूयी या यादीत अग्रस्थानी आहेत.

Web Title: business news indian women