इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी विशाल सिक्का यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

सिक्का यांच्या वेतनवाढीवरून गेल्या वर्षी वाद निर्माण झाला होता.

मुंबई : 'इन्फोसिस' या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला मुक्तपणे काम करू दिले नसल्याचे सांगत सिक्का यांनी व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

सिक्का यांच्या कार्यपद्धतीबाबत काही संचालकांनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर मूर्तीसुद्धा नाखूश होते. त्या पार्श्वभूमीवर सिक्का यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. 

 सिक्का यांच्या जागी यूबी प्रवीण राव यांची हंगामी व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केल्याची माहिती इन्फोसिसने शेअर बाजाराला दिली आहे. सिक्का यांच्याकडे तात्पुरता कार्यकारी उपाध्यक्षपदाचा भार सोपवण्यात आला आहे. गेल्या दिड वर्षात इन्फोसिसमधून अनेक वरिष्ठ अधिका-यांनी राजीमाने दिले आहेत. सिक्का यांना कंपनीने दोन वर्षांची मुदत वाढ दिली होती. सिक्का यांच्या वेतनवाढीवरून गेल्या वर्षी वाद निर्माण झाला होता. दरम्यान सिक्का यांच्या राजीनाम्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. इन्फोसिसचा शेअर ७ टक्कांनी घसरला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: business news infosys ceo vishal sikka resigns