कनिष्क गोल्डकडून ८२४ कोटींचा गंडा

यूएनआय
गुरुवार, 22 मार्च 2018

चेन्नई - हिरे व्यापारी नीरव मोदी आणि रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी यांच्याप्रमाणे येथील कनिष्क गोल्डने स्टेट बॅंक ऑफ इंडियासह (एसबीआय) १४ बॅंकांची ८२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ‘एसबीआय’ने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्क गोल्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूपेश जैन याच्याविरोधात ‘सीबीआय’ने या प्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. या गैरव्यवहाराची चौकशी सुरू असून, लवकरच कारवाई सुरू करण्यात येईल. ‘एसबीआय’ने ‘सीबीआय’कडे तक्रार केली आहे. यामध्ये १४ बॅंकांची कनिष्क गोल्डने ८२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे  म्हटले आहे. 

कनिष्कने ‘एसबीआय’, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा अशा १४ बॅंकांकडून कर्ज घेतले. ‘एसबीआय’च्या चेन्नईतील राजाजी सलाई शाखेतून कनिष्कने १७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. वार्षिक उत्पन्नाचे आकडे फुगवून दाखवून कंपनीने हे कर्ज घेतले होते. 

कनिष्कचा प्रवास 
कनिष्क गोल्डने पहिले दागिने विक्रीचे आउटलेट चेन्नईमध्ये सुरू केले. त्या वेळी कंपनीने साडेतीन टन दागिने निर्मितीची क्षमता असल्याचा दावा केला होता. चेंगलपट्टू येथे कंपनीने २०१० मध्ये निर्मिती प्रकल्प सुरू केला. देशातील सर्व प्रमुख शहरांतील आघाडीचे दागिने वितरकांना तनिष्ककडून दागिन्यांचा पुरवठा केला जातो. शहरातील कनिष्कचे आउटलेट आज बंद होते.

Web Title: business news Kanishk Gold scam