गुढीपाडव्यासाठी ‘मराठे ज्वेलर्स’चे मायक्रोसेट डायमंड कलेक्‍शन

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

पुणे - ‘मराठे ज्वेलर्स’ने गुढीपाडव्यासाठी कलात्मक व नावीन्यपूर्ण दागिन्यांचे ‘मायक्रोसेट डायमंड कलेक्‍शन’ सादर केले आहे. ग्राहकांची आवड, प्रचलित फॅशन आणि आपल्या सणावारांची संस्कृती यांचा बारकाईने विचार करूनच ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये गोल्ड, व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड, प्लॅटीनममध्ये साकारलेले पेंडंट आणि अंगठ्या आहेत. गुढीपाडवा आणि सहाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलतही जाहीर करण्यात आली आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील ‘मराठे ज्वेलर्स’चे नव्या मेगा स्टोअरला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या स्टोअरमध्ये दागिन्यांचे नवनवीन प्रकार आहेत. पौड रस्त्यावरील दालनामध्येही कोथरूड परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येत येताना दिसत आहेत. ‘मराठे ज्वेलर्स’चे मिलिंद व कौस्तुभ मराठे यांनी सांगितले, की हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये साऊथ सेटिंग किंवा मद्रास सेटिंग ही दाक्षिणात्य शैली आम्ही उपलब्ध करून दिली आहे. खास दाक्षिणात्य कारागिरांकडून घडविण्यात आलेले हे दागिने २२ कॅरेट सोन्यामध्ये तयार करण्यात आले आहेत. पुण्यात अशा प्रकारचे दागिने फक्त आमच्याकडेच उपलब्ध आहेत. त्याबरोबरच चांदीच्या वस्तू व गिफ्ट आर्टिकल्समध्येही नवी व आकर्षक श्रेणी पाहावयास मिळते.

Web Title: business news marathe jewellers pune

टॅग्स