‘मॅसे फर्ग्युसन’चा नवा ६०२८ ट्रॅक्‍टर 

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

पुणे - आघाडीचा ट्रॅक्‍टर उत्पादक ‘टॅफे’नुसार कंपनीचा मॅसे फर्ग्युसनचा ६०२८ हा प्रीमिअम कॉम्पॅक्‍ट मल्टियुटिलिटी ट्रॅक्‍टर महाराष्ट्रातील बागायती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या नव्या ट्रॅक्‍टरमध्ये ५४० आरपीएम टॉर्क देणारे अत्याधुनिक इंजिन आहे. यामुळे इंजिन दीर्घकाळ सुरू राहिले तरी तापत नाही. बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. विशेषतः द्राक्ष बागांमध्ये किंवा अन्य फळबागांमध्ये अखंडपणे काम करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळविणेही शक्‍य आहे. यातील ‘मॅसे मीन-लॉस’ या वैशिष्ट्यामुळे उच्च शक्ती प्रदान करण्याची क्षमता कमी-जास्त होत नाही.

पुणे - आघाडीचा ट्रॅक्‍टर उत्पादक ‘टॅफे’नुसार कंपनीचा मॅसे फर्ग्युसनचा ६०२८ हा प्रीमिअम कॉम्पॅक्‍ट मल्टियुटिलिटी ट्रॅक्‍टर महाराष्ट्रातील बागायती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या नव्या ट्रॅक्‍टरमध्ये ५४० आरपीएम टॉर्क देणारे अत्याधुनिक इंजिन आहे. यामुळे इंजिन दीर्घकाळ सुरू राहिले तरी तापत नाही. बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. विशेषतः द्राक्ष बागांमध्ये किंवा अन्य फळबागांमध्ये अखंडपणे काम करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळविणेही शक्‍य आहे. यातील ‘मॅसे मीन-लॉस’ या वैशिष्ट्यामुळे उच्च शक्ती प्रदान करण्याची क्षमता कमी-जास्त होत नाही. त्यामुळे स्प्रेने केली जाणारी फवारणी सातत्याने एकसमान पद्धतीने करणे शक्‍य होते. आकाराने अतिशय आटोपशीर अशा या ट्रॅक्‍टरमध्ये अनेक सुविधा आहेत. स्प्रेयर, रोटरी टिलर, नांगर, ट्रोली, लोडर आणि ‘बॅक हो’ ही साधने त्याला जोडता येतात, असे ‘टॅफे’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यगत अधिकारी टी. आर. केसवन यांनी म्हटले आहे. 

Web Title: business news Messi Ferguson new 6028 tractor