मुकेश अंबानी वीस दिवस देश चालवू शकतात! 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

रॉबिनहूड इंडेक्‍सने जगभरातील 49 अतिश्रीमंत व्यक्तींचा अभ्यास करून हे संशोधन तयार केले आहे. देशाची एकूण संपत्ती व अतिश्रीमंताची एकूण संपत्ती अशी तुलना या संशोधनात करण्यात आली आहे. देश चालविणाऱ्या अशा 49 अतिश्रीमंतांमध्ये केवळ चार महिला आहेत. अँगोला, ऑस्ट्रेलिया, चिली व नेदरलॅंड अशा चार देशांतील महिला अतिश्रीमंत आहेत. 

नवी दिल्ली : देशातील एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या पैशांवर देश चालवायची वेळ आलीच, तर त्यात भारत अमेरिका आणि चीनच्या पुढे राहणार असल्याचे एका अहवालात समोर आहे. "ब्लूमबर्ग'ने जाहीर केलेल्या 2018 च्या "रॉबिनहूड इंडेक्‍स'नुसार भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी 20 दिवस देशातील सरकार चालवू शकतात, इतका पैसा त्यांच्याकडे आहे. 

"रॉबिनहूड इंडेक्‍स'मध्ये जगभरातील श्रीमंत व्यक्ती व त्यांच्या संपत्तीवर किती दिवस देशाचा कारभार चालू शकतो याची माहिती देण्यात आली आहे. चीनचा विचार केल्यास चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांच्या संपत्तीवर चीनचा कारभार केवळ चार दिवस चालू शकतो, तर अमेरिकेतील धनाढ्य जेफ बेजॉस यांच्या संपत्तीवर अमेरिकेचा गाडा पाच दिवसांपर्यंत हाकला जाऊ शकतो. 

रॉबिनहूड इंडेक्‍सने जगभरातील 49 अतिश्रीमंत व्यक्तींचा अभ्यास करून हे संशोधन तयार केले आहे. देशाची एकूण संपत्ती व अतिश्रीमंताची एकूण संपत्ती अशी तुलना या संशोधनात करण्यात आली आहे. देश चालविणाऱ्या अशा 49 अतिश्रीमंतांमध्ये केवळ चार महिला आहेत. अँगोला, ऑस्ट्रेलिया, चिली व नेदरलॅंड अशा चार देशांतील महिला अतिश्रीमंत आहेत. 

अतिश्रीमंत---- संपत्ती------ देश------ देशाची चालविण्याची क्षमता 
1) जेफ बेझॉस-- 99 अब्ज-- अमेरिका--- 5 दिवस 
1) अमॅन्शिओ ओर्टिगा-- 75.3 अब्ज-- स्पेन--- 48 दिवस 
1) बर्नार्ड अर्नाल्ट-- 63.3 अब्ज-- फ्रान्स--- 15 दिवस 
1) कार्लोस स्लीम-- 62.8 अब्ज-- मेक्‍सिको--- 82 दिवस 
1) जॅक मा-- 45.5 अब्ज-- चीन--- 4 दिवस 
1) मुकेश अंबानी-- 40.3 अब्ज-- भारत--- 20 दिवस 
1) लि का शिंग-- 34.7 अब्ज-- हॉंगकॉंग--- 191 दिवस 
1) जॉर्ज पॉलो लेमन-- 29.6 अब्ज-- ब्राझील -- 13 दिवस 
1) जिओवनी फेरारो व कुटुंबिय -- 24.5 अब्ज-- इटली--- 9 दिवस 
1) डायटर स्वाझ-- 24.3 अब्ज-- जर्मनी --- 5 दिवस 

Web Title: business news Mukesh Ambani richest person