म्युच्युअल फंड - मूलभूत शंका आणि उत्तरे

मकरंद विपट
सोमवार, 19 मार्च 2018

गुंतवणूकदार ः मी गेल्या वर्षापासून मुच्युअल फंडात गुंतवणूक करत आहे. मला आता चांगला फायदापण झाला आहे. पण आता नव्या कररचनेनुसार मला मिळणाऱ्या सर्व नफ्यावर दहा टक्के कर द्यावा लागणार का?

गुंतवणूकदार ः मी गेल्या वर्षापासून मुच्युअल फंडात गुंतवणूक करत आहे. मला आता चांगला फायदापण झाला आहे. पण आता नव्या कररचनेनुसार मला मिळणाऱ्या सर्व नफ्यावर दहा टक्के कर द्यावा लागणार का?

उत्तर - एक फेब्रुवारी २०१८ रोजी जाहीर झालेल्या नव्या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार, शेअर बाजारात गुंतविणाऱ्या (इक्विटी) मुच्युअल फंडाच्या विक्रीनंतर मिळणाऱ्या नफ्यावरही लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स द्यावा लागणार आहे. पण जी गुंतवणूक एक फेब्रुवारी २०१८ च्या अगोदर केली आहे, त्यावर होणाऱ्या पूर्ण नफ्यावर दहा टक्के कर लागणार नाही. एक फेब्रुवारी २०१८ च्या अगोदर केलेल्या गुंतवणुकीला ‘ग्रॅंडफादर इफेक्‍ट’ लागू होणार आहे. आता हा ‘ग्रॅंडफादर इफेक्‍ट’ म्हणजे नक्की काय, हे आपण खालील उदाहरणातून पाहूया..

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने मुच्युअल फंडात १० जून २०१६ रोजी १०० रुपये गुंतविले होते आणि त्याने त्याची ती गुंतवणूक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी १८० रुपयांना विकली. म्हणजे त्याला ८० रुपये नफा झाला. पण त्या गुंतवणूदाराला पूर्ण ८० रुपयांवर दहा टक्के कर भरावा लागणार नाही. या नफ्याची विभागणी होईल. म्हणजे ३१ जानेवारी २०१८ रोजी त्या मुच्युअल फंडात गुंतविलेल्या १०० रुपयांची किंमत १५० रुपये होती आणि विक्री केलेल्या दिवसाची किंमत १८० रुपये होती. ३१ जानेवारी २०१८ पर्यंतच्या परताव्यावर कर भरावा लागणार नाही. कर भरावा लागेल तो विक्री केलेल्या दिवसाची किंमत वजा ३१ जानेवारी २०१८ ची किंमत म्हणजे १८०-१५० = ३०. म्हणजे १० टक्के कर फक्त ३० रुपयांवर भरावा लागेल आणि जर अशा सर्व गुंतवणूक मिळून त्या आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असेल तर जेवढी रक्कम एक लाख रुपयांच्या वर आहे, त्यावरच कर भरावा लागेल. थोडक्‍यात एक लाख रुपयांपर्यंतच्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. अर्थात हा ‘ग्रॅंडफादर इफेक्‍ट’ एक फेब्रुवारी २०१८ पासून लागू होणार, की नव्या आर्थिक वर्षापासून चालू होणार याबाबत अजून स्पष्टीकरण यायचे आहे.

Web Title: business news Mutual Funds