नीरव मोदी देतोय ईडीला आव्हान

पीटीआय
मंगळवार, 20 मार्च 2018

नवी दिल्ली - पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदी अप्रत्यक्षपणे मनी लाँडरिंग प्रकरणाला आव्हान देत असल्याचा दावा सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) केला. मोदी फायरस्टार डायमंड कंपनीआडून अप्रत्यक्षरीत्या ईडीला आव्हान देत आहे. 

ईडीचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल संदीप सेठी म्हणाले, की नीरव मोदी फरार असून, या प्रकरणात कंपनीमार्फत लुडबूड करण्याचा प्रयत्न करत आहे. फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल कंपनीने या प्रकरणाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचा दावाही सेठी यांनी या वेळी केला. पीएनबी गैरव्यवहाराचे प्रतिज्ञापत्र ईडीने आज दाखल केले. या प्रतिज्ञापत्राद्वारे आरोपींकडून करण्यात आलेली अंतरिम दिलाशासंबंधी आदेशाची मागणी अयोग्य असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे नीरव मोदीची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली आहे. नीरव मोदीच्या कंपनीचा उद्देश ईडीच्या कार्यवाहीवर रोख लावण्याचा आहे, तसेच तपास प्रक्रियेला साहाय्य न करण्याचा नीरवचा हेतू असल्याचेही ईडीने न्यायालयात सांगितले.

समन्सकडे दुर्लक्ष
नीरव मोदीला याआधी काही प्रकरणांमध्ये समन्सही बजावले आहेत; मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, अशी माहितीही ईडीकडून उच्च न्यायालयात देण्यात आली.

Web Title: business news neerav modi ED