नीरव मोदी ग्रुपमधील कंपन्यांवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - नीरव मोदी ग्रुपमधील दोन कंपन्यांविरोधात ५२ कोटींचा सीमा शुल्क बुडवल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी २०१४ मध्येही ‘डीआरआय’ने नीरव मोदी ग्रुपच्या कंपन्यांवर अशाच प्रकारचा गुन्हा नोंदवला होता. 

सुरत व जयपूर येथील ‘एसईझेड’मध्ये युनिट असलेल्या नीरव मोदी ग्रुपच्या कंपन्यांनी करमुक्त मालाची फेरफार केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या युनिटमधून हिरे व मोत्यांच्या आयात-निर्यातीचे काम होत असे. ‘एसईझेड’ युनिटमध्ये निर्यात करण्यासाठी आयात करण्यात आलेला कच्चा माल करमुक्त असतो; परंतु याप्रकरणी संबंधित कंपन्यांनी निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या किमतीत फेरफार केला. उर्वरित माल देशांतर्गत बाजारांमध्ये विकण्यात आल्याचे ‘डीआरआय’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबाबत डीआरआयने केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत ८९० कोटींचा माल म्हणजेच सुमारे ५२ कोटींची सीमा शुल्क असलेला स्थानिक बाजारात विकण्यात आला.

Web Title: business news Neerav Modi PNB DRI

टॅग्स