‘यामाहा’तर्फे नवी मोटारसायकल सादर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे - आयकॉनिक सीरिज असलेल्या एफझेडची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंडिया यामाहा मोटर प्रा.लि.ने नुकतीच ऑल न्यू एफझेडएस-एफआय (१४९ सीसी) मोटारसायकल सादर केली आहे. ‘यामाहा’ची ब्ल्यू कोअर टेक्‍नॉलॉजी आणि अद्ययावत ब्रेकिंग सिस्टिमला एकत्र आणून ही नवी एफझेडएस-एफआय मोटारसायकल चांगल्या अनुभवासोबतच उत्तम कार्यक्षमता प्रदान करते, असा दावा कंपनीने केला आहे.

यामाहा एफझेडएस-एफआय मोटारसायकल १४९ सीसी असून, यामध्ये एअरकुल्ड फ्युएल इंजेक्‍टेड, ४-स्ट्रोक, एसओएचसी, २-वॉल्व्ह, सिंगल सिलेंडर इंजिन या आपल्या वैशिष्ट्यांसोबतच २२० एमएम हायड्रोलिक सिंगल रिअर डिस्क ब्रेक आणि २८२ एमएमचा फ्रंट ब्रेकदेखील देण्यात आला आहे. यामुळे या मोटारसायकलची स्थिरता व नियंत्रण आणखी प्रभावी झाले आहे.

Web Title: business news new motorcycle by Yamaha

टॅग्स