‘हिरो’ची नवी पॅशन प्रो व पॅशन एक्‍सप्रो

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

पुणे - ‘हिरो मोटोकॉर्प’च्या पेटंटधारी आय ३ एस तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या नव्या ‘पॅशन प्रो’ आणि ‘पॅशन एक्‍सप्रो’ या बाईक सादर करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे रु. ५३,४६० आणि रु. ५४,४६० (एक्‍स शो-रूम पुणे) असल्याचे कंपनीने जाहीर केली आहे. या दोन नव्या मोटरसायकली देशभरातील बाजारपेठांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. मोटारसायकलींच्या बाजारपेठेत या कंपनीचा ५० टक्के वाटा आहे.

यासंदर्भात कंपनीच्या विक्री आणि ग्राहकसेवा विभागाचे प्रमुख अशोक भसीन म्हणाले, की ‘हिरो स्प्लेंडर’ या ब्रॅंडनंतर ‘पॅशन’ हा देशातील सर्वाधिक विकला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा मोटारसायकल ब्रॅंड आहे. ‘पॅशन १०० सीसी’ सध्या सुमारे २० टक्‍क्‍यांनी वाढत आहे. ‘पॅशन ११० सीसी’च्या या दोन नव्या प्रकारांमुळे मोटरसायकलींच्या देशी बाजारपेठेत आमचे आघाडीचे स्थान अधिक बळकट होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे.

Web Title: business news passion expro