गैरव्यवहार साडेतेरा हजार कोटींवर

गैरव्यवहार साडेतेरा हजार कोटींवर

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी आणखी एक तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) केली आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची रक्कम ९४२ कोटींनी वाढून १३ हजार ५७८ कोटी रुपयांवर पोचली आहे.

या तक्रारीमुळे गीतांजली जेम्स प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराची रक्कमही सात हजार ८० कोटींवर पोचली आहे. यापूर्वी या संपूर्ण गैरव्यवहाराची रक्कम १२ हजार ६३६ कोटी रुपये होती. ही नवी तक्रार ‘पीएनबी’कडून सीबीआयला ४ मार्चला देण्यात आली. या प्रकरणात बॅंक अधिकारी गोकूळनाथ शेट्टी याच्या सहभागानंतर ‘सीबीआय’ने संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे.

‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ देऊन पीएनबीमध्ये झालेल्या ११ हजार ३६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ‘सीबीआय’ने दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा २९ जानेवारीला नोंदवण्यात आला होता. त्यात नीरव मोदी व इतर आरोपींनी २८० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात या प्रकरणातील फसवणूक सहा हजार कोटी रुपयांची असल्याचे ‘सीबीआय’च्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय मेहुल चोक्‍सी व इतर आरोपींवर ४ हजार ८८६ कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com