चोक्‍सीचा पुन्हा चौकशीस नकार

पीटीआय
बुधवार, 21 मार्च 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मेहुल चोक्‍सी याने चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागासमोर (सीबीआय) हजर राहण्यास पुन्हा नकार दिला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. त्यामुळे माझा व्यवसाय अचानक बंद पडला असल्याने जुन्या सहकाऱ्यांकडून माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, अशी भीती चोक्‍सी याने व्यक्त केली आहे. 

चोक्‍सी याने ‘सीबीआय’ला १६ मार्चला पत्र लिहिले आहे. यात त्याने त्याच्यावर सुरू असलेले वैद्यकीय उपचार, पारपत्र निलंबित असणे आणि माध्यमांकडून सुरू असलेली बदनामी याविषयी उल्लेख केला आहे. त्याने म्हटले आहे, की विभागीय पारपत्र कार्यालयाने माझ्याशी अद्याप कोणताही पत्रव्यवहार केलेला नसून, माझे पारपत्र अजूनही निलंबित आहे. यामुळे मला भारतात प्रवास करणे शक्‍य नाही. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी यासह अनेक समस्या माझ्यासमोर आहेत. 

सुरक्षिततेची हमी नाही 
चोक्‍सी याने म्हटले आहे, की मी विदेशात असून, याआधी ‘सीबीआय’च्या नोटिशींनी उत्तर दिले आहे. मी परतल्यानंतर माझ्या सुरक्षिततेचे काय होणार, या मुद्‌द्‌यावर मला कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. मला व माझ्या कुटुंबाला धोका कायम असून, आम्हाला धमक्‍या येत आहेत. माझा व्यवसाय अचानक बंद झाल्याने माझे कर्मचारी, ग्राहक आणि कर्जदार शत्रू बनले आहेत.

Web Title: business news PNB Mehul Choksi CBI