जेएमडी मेडिकोचा महाराष्ट्रात विस्तार; भारतात 500 कोटी विक्रीचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

आगामी तीन वर्षांमध्ये 500 कोटी रुपयांची विक्री करण्याचे लक्ष्य

पुणे : जेएमडी मेडिको सर्विस लिमिटेडने संपूर्ण भारतात बहुविध उत्पादनांच्या श्रेणींचा दणक्यात विस्तार करण्याची घोषणा केली आहे. जेएमडी वेंचर्स लिमिटेडची उपकंपनी असून बीएसईवर लिस्टेड आहे. ही आयुर्वेदिक कंपनी असून तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. त्यांनी राज्यात 100% आयुर्वेदिक व नैसर्गिक उत्पादने दाखल केली आहेत.

जेएमडी मेडिकोच्या महाराष्ट्रातील प्रवेशामुळे त्यांच्या राष्ट्रीय वृद्धी धोरणाला साह्य मिळेल. कंपनीने मुंबईत लॉजिस्टिक सेंटर स्थापन केले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रासोबत शेजारील राज्यांमध्ये स्थानिक मागणीची पूर्तता करण्यात येईल. भारतातील पूर्वेकडील मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने कोलकात्यातही लॉजिस्टिक सेंटर आहे.

कंपनीने सांगितले की, 2015 मध्ये जेएमडी मेडिकोच्या प्रवासाला सुरवात झाली. आयुर्वेदाच्या मदतीने दर्जेदार आयुष्य निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. जेएमडी मेडिकोने देशाच्या पूर्वेकडील भागात यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या बाजारपेठेत 100% आयुर्वेदिक व नैसर्गिक उत्पादनांची बहुविध श्रेणी दाखल केली आहे. जेएमडी मेडिकोचा उद्देश हा आरोग्य, त्वचा, केस, शारीरिक समस्यांसंबंधी आयुर्वेदिक उद्योगक्षेत्रातील मातब्बर होण्याचे आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलीयोत केस, त्वचा, आरोग्य, शरीर निगा संबंधित 18 उत्पादनांचा समावेश आहे. आमचे लक्ष्य गाठण्यासाठी संपूर्ण भारतातून 5000 रिटेलर्सचा समावेश करण्याची योजना आम्ही आखली आहे. जेएमडी मेडिकोची सर्व उत्पादने ही 100% नैसर्गिक वनस्पतीजन्य आहेत, त्यांचा कोणताही साईड इफेक्ट नाही. जेएमडी मेडिको गुड मॅन्युफक्चरिंग प्रॅक्टीसेस (जीएमपी) सोबत जोडले असून 100% वनस्पतीजन्य प्रमाणपत्र धारक आहे.

जेएमडी मेडिको सर्विस लिमिटेडचे अध्यक्ष जगदिश पुरोहित म्हणाले की, “आयुर्वेदिक उत्पादनांना भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर मान्यता मिळते आहे. नैसर्गिक औषधांच्या फायद्यांसोबत या औषधांचे कोणत्याही पद्धतीचे साईड इफेक्ट नाही. याशिवाय भारत सरकारने आयुर्वेदिक उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन प्रचार सुरू केला आहे. यामुळे आयुर्वेदाला पाठबळ मिळते आहे. आमच्या पहिल्या वर्षातच आम्ही देशाच्या पूर्वेकडे मजबूत अस्तित्व निर्माण केले. आयुर्वेदिक उत्पादन विक्रीसाठी पश्चिम बाजारपेठ मुख्य ठरू शकते याचे निरीक्षण आम्ही केले. आमचे नेटवर्क वाढवून आणि देशभरात उत्पादनांचे लाँच करून वर्षाच्या शेवटी वाढ दुप्पट करण्याची आमची योजना आहे. आमचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही 50000 पॅन इंडियापेक्षा रिटेल नेटवर्क ठेवण्याची योजना आखत आहोतदर महिन्याला नवीन उत्पादन बाजारात आणून प्रोडक्ट पोर्टफोलियोत वाढ करण्याची आमची योजना आहे.”

भारतीय आयुर्वेदिक उत्पादन बाजारात नैसर्गिक केस निगा, त्वचा निगा, वनस्पतीजन्य ओरल केयर आणि पचनासंबंधी इतर उत्पादने, च्यवनप्राश व बाम उपलब्ध आहेत. 2021पर्यंत भारतीय आयुर्वेदिक बाजाराचे आकारमान 16% सीएजीआर इतके नोंदवण्यात येईल, असा अंदाज आहे. पुढील पाच वर्षांमध्ये आयुर्वेदिक नॅच्युरॉटीकल्स आणि डायटरी सप्लीमेंट, आयुर्वेदिक कॉस्मेटीक्स आणि स्कीन केयर प्रोडक्टची चलती राहील. अॅलोपॅथीच्या दुष्परिणामांबद्दल जागरुकता देशातील आयुर्वेदिक उत्पादनांसाठी उपभोक्ता वाढवणारी ठरेल. मल्टी ब्रँडेड स्टोअर्समध्ये आयुर्वेदिक उत्पादनांची उपलब्धता वाढल्याने देशातील आयुर्वेदिक उत्पादनांची विक्री वाढली आहे.

निसर्गाने दिलेले उत्तमोत्तम ग्राहकाला देण्याची बांधिलकी जेएमडी फाउंडेशन जपत आहे. कंपनीची उत्पादने संशोधन, तपासणी करून तयार करण्यात येतात. कंपनीचे हरिद्वार येथे स्वत:चे संशोधन आणि निर्माण (आर अँड डी) युनिट आहे. त्याठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांचे पॅनल कार्यरत आहे. जेएमडी मेडिको उत्पादने 5000 रिटेलर्सच्या माध्यमातून दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनीच्या हॉटलाईन क्रमांकावरून या 100% नैसर्गिक आयुर्वेदिक उत्पादनांची ऑर्डर देऊ शकते.

जेएमडी मेडिकोबद्दल :
जेएमडी मेडिको ही आयुर्वेदिक कंपनी असून ती जेएमडी व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी आहे. लोकांसाठी सुधारित आणि आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करणे हा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीला केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सेवन व वापरल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक औषधांचा सर्वात मोठा निर्मितीदार व्हायचे आहे. एप्रिल 2015मध्ये जेएमडी मेडिकोच्या प्रवासाला सुरुवात झाली. आयुर्वेदाच्या सहाय्याने दर्जेदार आयुष्य सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीकडून किफायतशीर दरात आयुर्वेदिक उत्पादने देण्यात येतात.
कंपनीच्या स्थापनेपासून सुरक्षित, नैसर्गिक आणि कल्पक उपाय निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जेएमडी मेडिकोची उत्पादने 100% नैसर्गिक आहेत. औषधांमुळे कोणतेही साईड इफेक्ट होऊ नये याची काळजी बाळगली जाते, असे सांगण्यात आले.
 

Web Title: business news pune JMD medico expansion maharashtra