‘एलओयू’, ‘एलओसी’वर रिझर्व्ह बॅंकेची बंदी

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - व्यापारासाठी अर्थसाह्य म्हणून देण्यात येणारी ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ (एलओयू) आणि ‘लेटर ऑफ कम्फर्ट’ (एलओसी) देण्यास सर्व बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने बंदी घातली आहे. 

मुंबई - व्यापारासाठी अर्थसाह्य म्हणून देण्यात येणारी ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ (एलओयू) आणि ‘लेटर ऑफ कम्फर्ट’ (एलओसी) देण्यास सर्व बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने बंदी घातली आहे. 

पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार ‘एलओयू’ आणि ‘एलओसी’च्या माध्यमातून झाला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘एलओयू’ आणि ‘एलओसी’वरील बंदीचा रिझर्व्ह बॅंकेने घेतलेला हा निर्णय तातडीने लागू झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की सध्याच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेतल्यानंतर व्यापारासाठी अर्थसाह्य म्हणून देण्यात येणाऱ्या ‘एलओयू’ आणि ‘एलओसी’ देण्यास सर्व बॅंकांना बंदी घालण्यात आली आहे. याचवेळी आयातीसाठी बॅंकांकडून देण्यात येणारी ‘लेटर ऑफ क्रेडिट’ आणि बॅंक हमी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, त्या देताना सर्व नियम आणि तरतुदींचे पालन बॅंकांना करावे लागेल. 

नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांनी ‘एलओयू’ आणि ‘एलओसी’च्या माध्यमातून ‘पीएनबी’ची फसवणूक केली आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागासह (सीबीआय) सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: business news reserve bank LOC LOU