विकासदर सात टक्‍क्‍यांसमीप राहील - नारंग

कैलास रेडीज 
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - सार्वजनिक बॅंकांना केंद्र सरकारची भांडवली मदत, कर्ज वितरणातील वाढ आणि आर्थिक सुधारणांच्या जोरावर चालू वर्षाअखेर विकासदर सात टक्‍क्‍यांच्यासमीप राहील, असा विश्‍वास बॅंक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ समीर नारंग यांनी व्यक्त केला आहे. विविध संस्थांकडून जाहीर होणाऱ्या विकासदराच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.१५) नारंग यांनी ‘सकाळ‘शी संवाद साधला. 

औद्योगिक उत्पादनातील वाढ सुखावणारी असून बुडीत कर्जांच्या बोजाखालील दबलेल्या सार्वजनिक बॅंकांना नुकताच सरकारने भांडवली मदत केली. गेल्या काही महिन्यांपासून अनेक बॅंका स्व:बळावर निधी उभारत आहेत. पुढील दोन ते तीन तिमाहींमध्ये बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारणार असून, कर्ज वितरणाला चालना मिळेल, असे नारंग यांनी सांगितले. 

Web Title: business news Sameer Narang