सॅमसंगने सादर केला दोन डिस्प्ले असलेला फोन

सॅमसंगने सादर केला दोन डिस्प्ले असलेला फोन

नवी दिल्ली - सॅमसंगने दोन डिस्प्ले असलेला एसएम-जी 9292 हा फोन सादर केला आहे. गेल्यावर्षी कंपनीने या फोनला चीनमध्ये ब्लॅक करंट वेरिएंटमध्ये लाँच केला होता. आता नव्या फोनमध्ये सॅमसंगने आणखी आकर्षक फिचर्स देऊ केले आहेत. विश्वास बसत नाही ना...की सॅमसंगचा हा दोन डिस्प्ले असलेला फोन कसा असेल? सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार या फोनचा एक डिस्प्ले हा आतमध्ये आणि दुसरा डिस्प्ले हा बाहेरच्या बाजूला असणार आहे.

गेल्यावर्षी हा फोन दक्षिण कोरियाच्या या कंपनीने चीनमध्ये डब्ल्यू 2017 नावाने सादर केला होता. आता याचे अपग्रेड वर्जन सॅमसंग एसएम-जी 9298 ला सादर करण्यात आले आहे. नवीन फोन असलेला सॅमसंग जी –9298 म्हणजेच लीडर 8 मध्ये गेल्यावर्षी सादर केलेल्या डब्ल्यू 2017च्या तुलनेत अधिक आकर्षक आहे. शिवाय यात उत्कृष्ठ कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगने एसएम-जी 9298 मध्ये 12 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे

कसा आहे फोन?
या नव्या स्मार्टफोनमध्ये 4.2 इंच फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले असून एक क्वाडकोर स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर आहे. ज्यात दोन कोर 2.15 गीगाहर्टसवर आणि दुसरे दोन 1.6 गीगाहर्टजवर चालत आहेत. सॅमसंग एसएम-जी 928 मध्ये 4 जीबी रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डमुळे 256 जीबी वाढविता येणार आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4 जीसोबतच मायक्रो यूएसबबी, यूएसबी 2..0, ब्ल्यूटूथ 4.1, एनएफसी, वाय-फाय, आणि जीपीएस सारखे फीचर्स आहेत. फोनची २३०० एमएचची बॅटरीमुळे 68 तासापर्यंत स्टॅंडबाय टाईम मिळत असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com