किमान शिल्लक मर्यादेत ‘एसबीआय’कडून कपात

पीटीआय
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांकडून किमान शिल्लक शुल्क आकारणी बंद करण्यासह महानगरीय भागात किमान शिल्लक रकमेत दोन हजार रुपयांची कपात करून ती पाच हजारांहून तीन हजार रुपये करण्याचे एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे महानगरीय व निमशहरी भागात एकच किमान शिल्लक रक्कम असणार आहे. १ ऑक्‍टोबर २०१७ पासून एसबीआयच्या नव्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

किमान शिल्लक शुल्कातून निवृत्तिवेतनधारक व अल्पवयीनांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही एसबीआयने घेतला आहे. एसबीआयच्या निर्णयाचा निवृत्तिवेतनधारकांसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याचसह एसबीआयने किमान खाते शिल्लक शुल्कातही वीस ते पन्नास टक्के कपात केली असून, निमशहरी व ग्रामीण भागांत २० ते ४० रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करण्यात येईल. तर शहरी व महानगरीय भागात तीस ते पन्नास रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये यापुढे महानगरीय व शहरी भागांतील शाखांची एक श्रेणी असणार आहे.

Web Title: business news SBI

टॅग्स