सेन्सेक्‍समध्ये किरकोळ घसरण

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१ अंशांच्या घसरणीसह बुधवारी ३३ हजार ८३५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५ अंशांची घट होऊन १० हजार ४१० अंशांवर बंद झाला. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांची हकालपट्टी करून त्याजागी ‘सीआयए’चे संचालक माईक पाँपिओ यांची नियुक्ती काल (ता.१३) केली. पाँपिओ यांची चीन आणि इराणविरोधात कठोर भूमिका असल्याने जागतिक पातळीवर व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिकेतील शेअर बाजाराला फटका बसला. याचाच परिणाम होऊन आशियाई शेअर बाजारही घसरले.

Web Title: business news sensex