सेन्सेक्‍स पुन्हा ३३ हजारांवर 

पीटीआय
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स बुधवारी १३९ अंशांची वाढ होऊन ३३ हजार १३६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍सने आज पुन्हा ३३ हजार अंशांची पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० अंशांनी वधारून १० हजार १५५ अंशावर बंद झाला. 

अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’च्या पतधोरण आढावा बैठकीतील घडामोडींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यातच बैठकीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर वाढला. परकी गुंतवणूकदारांचा निधीचा ओघही वाढला. यामुळे सेन्सेक्‍स ३३ हजार ३५४ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. अखेर कालच्या तुलनेत १३९ अंश म्हणजेच ०.४२ टक्के वाढ होऊन तो ३३ हजार १३६ अंशांवर बंद झाला. 

Web Title: business news Sensex again recovered to 33000