शेअर बाजारात तेजी

पीटीआय
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - शेअर बाजारातील मंदीला सोमवारी ब्रेक लागला. बॅंकिंग क्षेत्रातील शेअरच्या खरेदीमुळे सेन्सेक्‍स मोठ्या वाढीसह बंद झाला. बॅंकिंग क्षेत्रासह वाहन, धातू व रिअल्टी क्षेत्रातील शेअर आज तेजीत होते. बाजारातील तेजीच्या पार्श्‍वभूमीवर सेन्सेक्‍स ४७० अंशांनी वधारून ३३ हजार ६६ अंशांवर बंद झाला, तर निफ्टी १३३ अंशांनी वधारून १० हजार १३१ अंशांवर बंद झाला.

आशियाई बाजारातील व्यापार युद्धाच्या स्थितीमुळे सोमवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरवात हळुवार झाली; मात्र रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने बाजारातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गुंतवणूकदारांनी बॅंक, वित्त, धातू क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीचा सपाटा लावला होता. बॅंकिंग, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन क्षेत्रातील शेअर मजबूत अवस्थेत होते. व्यापार युद्धाच्या भडक्‍यानंतर अमेरिका आणि चीनने नमते घेण्याचे धोरण अवलंबले आहे. व्यापारी संबंध सुधारण्यासाठी चीनने अमेरिकेसह चर्चा सुरू केली आहे. दोन्ही देशांमधील चर्चेमुळे व्यापारी युद्धाची शक्‍यता टळल्याची चिन्हे दिसत आहेत. 

गुंतवणूकदारांनी १.५२ लाख कोटी कमावले
सोमवारी गुंतवणूकदारांनी १.५२ लाख कोटी रुपये कमावले. शुक्रवारी (ता. २३) सेन्सेक्‍सच्या यादीतील एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल १ कोटी ३९ लाख ३० हजार ६४३.१६ कोटी रुपये होते. सोमवारी दिवसाखेर हेच बाजारभांडवल १ लाख ५२ हजार २६२.८४ कोटी रुपयांनी वधारून १ कोटी ४० लाख ८२ हजार ९०६ रुपये झाले होते.

व्यापारयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपीय व आशियाई बाजारातील सकारात्मक स्थितीचा बाजाराला फायदा झाला. मर्यादित व्यापाराच्या धोरणामुळे गुंतवणूकदारांनीही सावध धोरण अवलंबले होते.
-विनोद नायर, प्रमुख संशोधक, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिस.

Web Title: business news share market