घसरणीने गुंतवणूकदार धास्तावले

पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले. 

‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त १३५.७५ अंशांची घट झाली आणि तो ९,७३५ अंशावर बंद झाला. सलग सात सत्रात ‘सेन्सेक्‍स’ने १२७० अंश गमावले असून, या पडझडीत तब्बल सहा लाख कोटींचा चुराडा झाला आहे. 

उत्तर कोरिया-अमेरिका संघर्ष, खनिज तेलाच्या वाढत्या किंमती, फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढीचे संकेत, रुपयाचे विक्रमी अवमूल्यन आणि महागाई, जीएसटीचा घटलेला महसूल, पतमानांकन कपातीची शक्‍यता आदी घडामोडींनी गुंतवणूकदारांमधील भीती वाढवली आहे. यावर विशेष लक्ष ठेवून असलेल्या परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेऊन गुंतवणूक कमी करण्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी, निर्देशांकातील घसरण दिवसागणिक वाढत आहे. बॅंका, रिॲल्टी, भांडवली वस्तू, ऊर्जा आदी क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली गेली. 

सलग सात सत्रांमध्ये सेन्सेक्‍सने १२७० अंश गमावले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांची एकूण मालमत्ता ६.१८ लाख कोटींनी कमी झाली आहे. आजच्या एका सत्रात गुंतवणूकदारांना जवळपास दीड लाख कोटी गमवावे लागले. मुंबई शेअर बाजारात अदानी  पोर्ट, एसबीआय, रिलायन्स,  डीव्हीज लॅब, डॉ. रेड्डीज लॅब, 
सन फार्मा आणि आयसीआयसीआय बॅंक आदी शेअरमध्ये घसरण  झाली. टीसीएस आणि कोल इंडिया  हे दोन शेअर वधारले. शेअर बाजाराच्या माहितीनुसार, परकी गुंतवणूकदारांनी मंगळवारी १९१५ कोटींची विक्री  केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र १५३७ कोटींचे शेअर खरेदी केले.  रुपयाने गाठला सहा महिन्यांचा नीचांक परकी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्याने चलन बाजारात रुपयाने सहा महिन्यांचा नीचांक नोंदविला. शेअर निर्देशांकातील घसरणीची सर्वाधिक झळ रुपयाला बसली. डॉलरच्या तुलनेत रुपयात २७ पैशांचे अवमूल्यन झाले. परकी संस्थांनी गुंतवणूक काढून घेतल्याने डॉलरची मागणी वाढली. यामुळे दिवसअखेर रुपया ६५.७२ या नीचांकी पातळीवर बंद झाला. 

Web Title: business news share market