सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी

मुंबई - शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद झाला आहे. दिवसअखेर ‘सेन्सेक्‍स’ ११८.४५ अंशांच्या वाढीसह ३३,४७८.३५ पातळीवर व्यवहार करीत स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ २८.१५ अंशांनी वधारून १०,३२६.९० अंशांवर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये आज नफावसुली झाल्याने घसरण नोंदविण्यात आली. क्षेत्रीय पातळीवर पीएसयू बॅंक, एफएमसीजी, रिॲल्टी, कॅपिटल गुड्‌स आणि मेटल निर्देशांकात किंचित घसरण झाली. मात्र फार्मा, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस आणि पॉवर कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीचा उत्साह होता.

मुंबई शेअर बाजारात डॉ. रेड्डीज, सन फार्मा, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, सिप्ला आणि एनटीपीसी हे शेअर प्रत्येकी ५.२५ ते १.६ टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाले, तर इंडियाबुल्स हाउसिंग, कोल इंडिया, आयटीसी, अंबुजा सिमेंट, टीसीएस, कोटक महिंद्रा बॅंक आणि एसबीआय १.८ ते ०.७ टक्के घसरणीसह बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com