शेअर बाजारात नवा उच्चांक

पीटीआय
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - कार्पोरेट क्षेत्रातील सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण जाणवले. दिवसअखेर सेन्सेक्‍स २५१ अंशांच्या वाढीसह ३४,८४३.५१ अंशांवर पोचला. निफ्टीही ६०.३० अंशांच्या वाढीसह नव्या उच्चांकावर म्हणजेच १०,७४१.५५ अंशांवर पोचला. 

दरम्यान, आयडीएफसी बॅंकेने नुकतीच कॅपिटल फर्स्टच्या अधिग्रहणाची घोषणा केली. परिणामी आज मुंबई शेअर बाजारात कॅपिटल फर्स्टच्या शेअरने इंट्राडे व्यवहारात ८ टक्‍क्‍यांनी वधारला होता. शेअरने इंट्राडे व्यवहारात ९०२ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे; तर आयडीएफसी बॅंकेच्या शेअरमध्ये आज २.८१ टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे.

येत्या १ एप्रिल २०१८ रोजी आयडीएफसी बॅंक आणि कॅपिटल फर्स्टचे एकत्रीकरण प्रत्यक्षात येणार आहे. आयडीएफसी बॅंक आणि कॅपिटल फर्स्टमध्ये झालेल्या करारानुसार, ‘कॅपिटल फर्स्ट’च्या भागधारकांना आता आयडीएफसी बॅंकेचे शेअर्स मिळणार आहेत. म्हणजेच ‘कॅपिटल फर्स्ट’च्या १० शेअर्सच्या बदल्यात आयडीएफसी बॅंकेचे १३४ शेअर्स देण्यात येणार आहे.

Web Title: business news share market