सेन्सेक्स 1200, तर निफ्टी 360 अंशांनी आपटला

कैलास रेडीज
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सलग सहाव्या सत्रात निर्देशांकाची ससेहोलपट सुरू आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत देखील 350 अंशांची घसरण झाली असून तो 10 हजार 300 अंशाच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

मुंबई : दीर्घकालीन भांडवली नफा कराचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी बाजार उघडताच सेन्सेक्सने 1200 अंशांची आपटी खाल्ली. तो 34 हजार अंशांच्या खाली आला आहे.

सलग सहाव्या सत्रात निर्देशांकाची ससेहोलपट सुरू आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत देखील 360 अंशांची घसरण झाली असून तो 10 हजार 300 अंशाच्या पातळीवर व्यवहार करत आहे. युरोप आणि आशियातील शेअर बाजारामध्ये 'ग्लोबल सेलऑफ' दिसून आला असून त्याचे पडसाद भारतीय बाजारांवर उमटले आहेत. शेअर बाजारातील पडझड रोखण्यासाठी सरकार 'एलआयसी' सारख्खा बड्या स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्याचे आवाहन करत आहे.

आजपासून आरबीआयची पतधोरण बैठक सुरू होणार असून याकडे गुंतवणूकदार लक्ष देऊन आहेत. या पडझडीत स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्सची होरपळ झाली. आतापर्यंत सहा सत्रात सेन्सेक्सने दोन हजार अंश गमावले असल्याने किरकोळ गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

Web Title: business news Share market down sensex nifty slips