शेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम

पीटीआय
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई - शेअर बाजारातील पडझड सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १५० अंशांच्या घसरणीसह ३३ हजार ६८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० अंशांची घट होऊन १० हजार ३६० अंशांवर बंद झाला. 

पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) चंद्री पेपर्स ॲण्ड अलाईड प्रॉडक्‍ट्‌स या कंपनीला नऊ कोटी रुपयांची लेटर ऑफ अंडरटेकिंग (एओयू) दिल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यामुळे शेअर बाजारात बॅंकांच्या समभागांवर विक्रीचा जोरदार मारा राहिला. चीनच्या उत्पादनांवर जादा आयात शुल्क अमेरिका आकारण्याची शक्‍यता असून, अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’कडून व्याजदर वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त होत आहे. यामुळे ‘वॉल स्ट्रीट’मध्ये घसरण झाली. याचाच परिणाम होऊन आशियाई देशांतील शेअर बाजारांमध्ये संमिश्र स्थिती दिसून आली. 

जागतिक बॅंक आणि ‘फिच’ या पतमानांकन संस्थेने आगामी आर्थिक वर्षात भारताच्या विकास दराचा चांगला अंदाज व्यक्त केल्याने देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण काही प्रमाणात रोखली गेली. सेन्सेक्‍समध्ये सलग तीन सत्रांत २३२ अंशांची घसरण झाली आहे. येस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या समभागात आज जास्त घट नोंदविण्यात आली. 

सेन्सेक्‍स  
३३,६८५ (-१५०) 
निफ्टी 
१०,३६० (-५०)

Web Title: business news share market PNB