लाखो क्रेडिट कार्डची माहिती चोरीला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

शिकागो - ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी ‘एक्‍सपीडिया’ची उपकंपनी असलेल्या ऑरबिट्‌झ या ट्रॅव्हल पोर्टलवरून सुमारे ८ लाख ८० हजार ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती हॅकरनी चोरल्याचे समोर आले आहे. ग्राहकांच्या क्रेडिट कार्डच्या गोपनीय माहितीची चोरी १ जानेवारी २०१६ ते २२ डिसेंबर २०१७ या काळात झाल्याची शक्‍यता आहे. ऑरबिट्‌झच्या ट्रॅव्हल पोर्टलवरून ग्राहकांची नावे, दूरध्वनी क्रमांक, बिलिंगचा पत्ता हॅकरनी मिळविला असावा, असा अंदाज आहे. 

Web Title: business news Stolen millions of credit card information