व्यापारयुद्ध भडकणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन - चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या २०० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर २५ टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करीत आहेत. याआधी चिनी उत्पादनांवर १० टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या जादा शुल्काच्या प्रस्तावामुळे व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने ३४ अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर २५ टक्के शुल्क आकारले आहे. आता आणखी १६ अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची योजना आहे. ट्रम्प यांनी सुरवातीला २०० अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर १० टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. आता हे शुल्क २५ टक्‍क्‍यांवर नेण्याचा विचार अमेरिका सरकारकडून सुरू आहे.

याविषयी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, ‘‘व्यापारी संबंधांतील तणाव वाढविणारे निर्णय अमेरिका घेत आहे. यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. अमेरिकेला उत्तर म्हणून चीन आपल्या हित व हक्कांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलेल.’’  अमेरिकेची चीनसोबतच्या व्यापारातील तूट २०१७ मध्ये ३७६ अब्ज डॉलर होती. ही व्यापारी तूट कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. चीनकडूनही अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्यात आले आहे.

Web Title: Business War America and China