माइंडट्री करणार 270 कोटींच्या शेअर्सचे बायबॅक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई: माहिती तंत्रज्ञान(आयटी) कंपनी माइंडट्रीने भागधारकांना शेअर बायबॅक योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी 11 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. यादिवशी, ज्या भागधारकांच्या नावावर कंपनीचे शेअर्स असतील त्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी 'लेटर ऑफ ऑफर' पाठविले जाईल. त्यामुळे, बायबॅक योजनेत सहभागी घेण्यासाठी गुंतवणूकदारांना आजच(शुक्रवार, ता.8 ) कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागतील.

बायबॅक योजनेअंतर्गत कंपनी 43.2 लाख शेअर्सची खरेदी करणार आहे. यासाठी प्रतिशेअर 625 रुपयांची किंमत निश्चित झाली आहे. या योजनेसाठी कंपनीला सुमारे 270 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

आयटी कंपन्यांकडे सध्या रोखीचा साठा वाढत चालला असून भागधारकांना तसेच गुंतवणूकदारांना यात वाटा मिळावा या मागणीला प्रतिसाद अनेक कंपन्यांनी शेअर बायबॅक योजना हाती घेतली आहे. गेल्या महिन्यात टीसीएसने 16000 कोटींच्या मेगा बायबॅकची घोषणा केली होती. त्याआधी विप्रोने 3000 कोटींचे शेअर्स बायबॅक केले होते. तसेच, एचसीएल, इन्फोसिस आणि एचसीएलनेदेखील बायबॅक योजनेची घोषणा केली आहे.

मुंबई शेअर बाजारात माइंडट्रीचा शेअर सध्या(12 वाजून 20 मिनिटे) 545.50 रुपयांवर व्यवहार करत असून अवघ्या 0.05 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: Buybacks of shares of MindTree 270 crores