Byju's ने घडवला इतिहास, बाजारमूल्य पोचले 5.5 अब्ज डॉलरवर...

Byju's ने घडवला इतिहास, बाजारमूल्य पोचले 5.5 अब्ज डॉलरवर...

नवी दिल्ली: बायजूस ( Byju's) या शिक्षण क्षेत्रातील सेवा पुरवणाऱ्या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीचे बाजारमूल्य 5.5 अब्ज डॉलरवर (जवळपास 37,400 कोटी रुपये) पोचले आहे. त्यामुळे बायजूस आता जगातील सर्वात जास्त बाजारमूल्य असलेली शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. यातून बायजूसने एक नवा इतिहासच घडवला आहे. भांडवल गुंतवणूकीच्या नवी फेरीनंतर कंपनीच्या बाजारमूल्यात ही वाढ झाली आहे. भांडवल उभारणीच्या एकाच फेरीत कंपनीचे बाजारमूल्य 53 टक्क्यांनी वाढले आहे. याआधी डिसेंबरमध्येसुद्धा कंपनीने गुंतवणूक मिळवली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या नॅस्पर्स, कॅनेडा पेन्शन प्लॅन आणि जनरल अटलांटिक यांची 54 कोटी डॉलरची गुंतवणूक झाल्यानंतर कंपनीचे बाजारमूल्य 3.6 अब्ज डॉलरवर पोचले होते. बायजूस ही बंगळूरूस्थित स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीने आतापर्यत एफ सेरिज फेऱ्यांमधून 3,159.4 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे.

 बायजूसने अत्यंत कमी कालवधीत मिळवलेले यश अभूतपूर्व आहे. मागील तीन वर्षात कंपनी 100 टक्क्यांनी विस्तारली आहे. या क्षेत्रामध्ये फारशी स्पर्धा नसल्यामुळे आणि मोठ्या कंपन्या फारशा नसल्यामुळे बायजूसचा विस्तार वेगाने होत राहील असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एप्रिलपर्यत कंपनीचे 3.5 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते होते तर 24 लाख ग्राहक आहेत. त्यातून बायजूसला 200 कोटी रुपयांचा महसूल दरमहिन्याला मिळतो आहे. मागील वर्षी कंपनीचा एकूण महसूल 1,430 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षात 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. बायजूसच्या बाजारमूल्यातील 20 टक्के हिस्सा हा गुंतवणूक मूल्याचा आहे तर उर्वरित 80 टक्के बाजारमूल्य हे इक्विटीच्या मूल्याचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com