'रोसनेफ्ट-एस्सार व्यवहाराने निर्बंधांचा भंग नाही'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

वॉशिंग्टन : रशियातील सरकारी मालकीच्या रोसनेफ्ट या तेल कंपनीने भारतातील एस्सार ऑइल विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपीय समुदायाने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भंग होत नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. 

रोसनेफ्ट 12.9 अब्ज डॉलरला एस्सार ऑइल विकत घेत आहे. याबाबतची घोषणा ब्रिक्‍स परिषदेवेळी गोव्यात झाली. याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर म्हणाले, ''या व्यवहारामुळे अमेरिका व युरोपीय समुदायाच्या निर्बंधांचा भंग झालेला नाही. या व्यवहाराच्या बातम्या मी पाहिलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी भारत आणि रशिया सरकारकडेच विचारणा करा.'' 

क्रिमिया आणि पूर्व युक्रेनमध्ये केलेल्या कारवाईबद्दल रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 15 ऑक्‍टोबरला रोसनेफ्ट - एस्सार व्यवहाराची घोषणा केली होती. रोसनेफ्टने एस्सार ऑइलमधील 49 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. यासोबत नेदरलॅंडस्थित ट्रॅफिगरा समूह आणि रशियातील युनायटेड कॅपिटल पार्टनर्सने उरलेला 49 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. उरलेला दोन टक्के हिस्सा एस्सारच्या भागधारकांकडे राहील.

Web Title: Can not take objection on Rosneft Essar deal, says US