'कॅटलिस्ट ट्रस्टीशिप'ला 'बेस्ट ट्रस्टी'चा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - 'इंडियन सिक्‍युरिटायझेशन फाउंडेशन'तर्फे दिल्या जाणाऱ्या इंडियन सिक्‍युरिटायझेशन अवॉर्डच्या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. (पूर्वीचे नाव जीडीए ट्रस्टीशिप लि.) यांची निवड झाली आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपला 'द बेस्ट ट्रस्टी ऑफ द इयर 2017' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

इंडियन सिक्‍युरिटायझेशन फाउंडेशन ही स्वायत्त संस्था असून, तिचा उद्देश भारतीय आर्थिक क्षेत्रात 'सिक्‍युरिटायझेशन' ही संकल्पना जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हा आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपने केवळ चौथ्या वर्षातच हा पुरस्कार मिळविला आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. ही 'सेबी'कडे डिबेंचर ट्रस्टी म्हणून नोंद असलेली देशातील खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे.

Web Title: Catalist Trustship won 'Best Trusti' award