चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयची 'लूकआऊट नोटीस' 

चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयची 'लूकआऊट नोटीस' 

नवी दिल्ली: व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयने 'लूकआऊट नोटीस' जारी केली आहे. चंदा कोचर यांच्याबरोबर त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात देखील लूकआऊट नोटीस' जरी केली आहे. तसेच चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली असून सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती कळवण्याचे आदेश दिले आहेत. चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. बँकेतील पदाचा गैरवापर करत काही लोकांना आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यात चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या.

माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली होती. न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वाखाली आयसीआयसीआयच्या मंडळाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली.

काय आहे प्रकरण? 
आयसीआयसीआय आणि व्हिडीओकॉन यांच्यादरम्यान झालेल्या कर्जवाटपासंदर्भात सीबीआयकडून छापा टाकण्यात आले आहे. चंदा कोचर यांच्या नावाचा वापर करून आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला कर्ज दिले आहे. त्याबदल्यात दीपक कोचर यांना व्हिडीओकॉनने सहाय्य केले होते असा आरोप करण्यात आला आहे. चंदा कोचर यांचे नाव यात आल्यामुळे त्यांना यसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून पायउतार व्हावे लागले होते. 
 कोचर यांनी आयसीआयसीआयच्या प्रमुख असताना धूत यांच्या कंपनीला  3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात वेणूगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपॉवरमध्ये 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप एका गुंतवणूकदाराने केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com