रिझर्व्ह बँकेच्या रडारवर आता सेंट्रल बँक

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बॅंकेवर बुडीत कर्जांप्रकरणी कारवाई (प्रॉम्ट करेक्‍टीव्ह अॅक्‍शन) केली आहे. यानुसार बँकेला नव्याने कर्ज वितरण करण्यावर तसेच लाभांश वितरण करताना निर्बंध येणार आहेत. याआधी आरबीआयने देना बँक, आयडीबीआय बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि युको बॅंकेवर कर्ज थकबाकीवर कारवाई केली होती.

सेंट्रल बँकेच्या निव्वळ थकीत कर्जांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मालमत्तांवरील परतावा उणे झाल्याने आरबीआयने अॅक्शन घेतली आहे. या सर्व उपायोजनांमुळे बँकेची एकुण कामगिरी सुधारण्यास मदत होईल असे सेंट्रल बँकेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ( आणखी वाचा: रिझर्व्ह बॅंकेकडून 'एनपीए'च्या विरोधात मोठे पाऊल)

बॅंकांची ढोबळ बुडीत कर्जे 10 टक्‍क्‍यांवर गेल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून कारवाई केली जाते. सेंट्रल बँकेला मार्चअखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात तब्बल 2,439 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. दरम्यान, बुडीत कर्जांचे प्रमाण 10.20 टक्क्यांवर पोचले आहे. मालमत्तांवरील परतावा उणे 0.80 टक्के झाला आहे. ( आणखी वाचा:  देना बॅंकेवर 'आरबीआय'चे निर्बंध )

सेंट्रल बँकेचा शेअर सध्या(1 वाजून 10 मिनिटे) 99.80 रुपयांवर व्यवहार करत असून 1.82 टक्क्याने घसरला आहे.

Web Title: The Central Bank now has the Reserve Bank's radar