LPG Subsidy : स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीसंदर्भात सरकार उचलणार मोठं पाऊल, जाणून घ्या काय होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Cylinder Subsidy

सबसिडी प्राप्त करणार्‍यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

LPG Subsidy : स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीसंदर्भात सरकार उचलणार मोठं पाऊल

Gas Cylinder Subsidy : गॅस सिलिंडरवरील (Gas Cylinder) सबसिडी पूर्णपणे काढून टाकण्याच्या उद्दिष्टाच्या जवळ सरकार पोहोचलंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं (Union Ministry of Petroleum) लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार, एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाची (सरकार) किंमत आर्थिक वर्ष 2011 मध्ये 11,896 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये केवळ 242 कोटी रुपयांवर आलीय.

केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी सांगितलं की, 'देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संबंधित उत्पादनांच्या किमतीशी निगडीत असतात. मात्र, तरीही सरकार घरगुती गॅस ग्राहकांसाठी किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एलपीजी सबसिडीच्या (LPG Subsidy) बाबतीत, सरकारनं आर्थिक वर्ष 2018 मध्ये 23,464 कोटी रुपये, आर्थिक वर्ष 2019 मध्ये 37,209 कोटी आणि आर्थिक वर्ष 2020 मध्ये 24,172 कोटी रुपये खर्च केलंय.'

हेही वाचा: Google Map : औरंगाबाद की संभाजीनगर?; तीव्र विरोधानंतर गुगलची माघार

सरकारनं जून 2020 मध्ये निर्णय घेतल्यानं अनुदानित गॅस सिलिंडर केवळ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांनाच उपलब्ध होतील, तसंच सबसिडी प्राप्त करणार्‍यांच्या संख्येतही मोठी घट झालीय. सरकारनं एका वर्षात 12 रिफिलपर्यंत PMUY लाभार्थ्यांसाठी प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान सुरू केलंय. दरम्यान, सिलिंडरवरील अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जातं.

हेही वाचा: Sanjay Raut : बंडखोर आमदारांची राजकीय तिरडी उठणारच; राऊतांचा कडक शब्दात इशारा

घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीही अलीकडच्या काळात सातत्यानं वाढत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी चार महानगरांमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली होती. सध्या दिल्लीत एका सिलिंडरची किंमत 1,053 रुपये आहे. आकडेवारीवरून असं दिसून आलं की, एप्रिल 2019 मध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती 706.50 रुपये प्रति सिलिंडरवरून 1 मे 2020 रोजी 581.5 रुपये प्रति सिलिंडरवर आल्या आहेत. मात्र, त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये करण्यात आलेल्या 10 रुपयांच्या कपातीशिवाय सिलिंडरची किंमत सातत्यानं वाढत आहे.

Web Title: Central Government Will Withdraw Subsidy On Gas Cylinders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top