मोदी सरकार बँकांना देणार 42 हजार कोटी रुपये

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली: केंद्र सरकार बँकांना आवश्यक भांडवलाचे प्रमाण राखता यावे यासाठी 42 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल देणार आहे. . चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सरकारकडून हा निधी बँकांना देण्यात येईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. थकित कर्जांच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकांना दिलासा देणारा हा निर्णय आहे. बँकांना एकूण 2.11 लाख कोटी रुपयांचे भांडवल देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यापैकी 1.35 लाख कोटी रुपये रोख्यांच्या स्वरूपात तर, उर्वरित रक्कम बाजार भांडवलातून उभारली जाणार आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना एक निश्चित भांडवलाचे प्रमाण ठेवावे लागते. मात्र थकित कर्जांच्या ओझ्यामुले आणि घसरत्या नफ्यामुळे काही बँका  भांडवलाचे प्रमाण राखण्यास अपयशी ठरल्या आहेत. 42 हजार कोटी रुपयांच्या भांडवलापैकी बँकांना पहिला हप्ता पुढील महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेला याआधी देखील भांडवल पुरवण्यात आले होते. आता मात्र दोन्ही बँकांना गरज भासणार नसल्याचे सांगण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centre To Infuse 42,000 Crore Rupees In Debt-Laden State-Run Banks