चाकणला ‘मर्सिडीज-बेंझ’च्या नव्या मॉडेलचे आता उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या चाकण (पुणे) येथील कारखान्याची क्षमता वर्षाकाठी २० हजार गाड्यांची निर्मिती करण्याइतकी आहे. देशातील लक्‍झरी मोटारींच्या उत्पादकांमध्ये ही क्षमता सर्वात मोठी ठरते.

पुणे - भारतातील सर्वांत मोठी लक्‍झरी कार उत्पादक कंपनी असलेल्या मर्सिडीज-बेंझने प्रथमच आपल्या एएमजी श्रेणीतील वाहनाची, ‘एएमजी जीएलसी ४३ फोरमॅटिक कूपे’ या मॉडेलची स्थानिक पातळीवर निर्मिती केली आहे. पुण्याजवळील चाकण येथील प्लान्टमध्ये ही कार तयार झाली आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडिया आता आपली नवीन जनरेशन कार (एनजीसी), सेडान, एसयूव्ही आणि एएमजी परफॉर्मन्स कार यांचे उत्पादन याच कारखान्यात करणार आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या चाकण (पुणे) येथील कारखान्याची क्षमता वर्षाकाठी २० हजार गाड्यांची निर्मिती करण्याइतकी आहे. देशातील लक्‍झरी मोटारींच्या उत्पादकांमध्ये ही क्षमता सर्वात मोठी ठरते. देशात बनवलेली ही पहिलीच एएमजी श्रेणीतील गाडी एएमजी जीएलसी ४३ फोरमॅटिक कूपे कारखान्यातून बाहेर चालवत आणण्याचा मान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क आणि ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक पीयूष अरोरा यांना मिळाला.  

हेही वाचा :  पुण्यात उद्योगचक्राला गती; उत्पादनक्षमता आता ७२ टक्के

श्वेन्क म्हणाले, ‘‘लक्‍झरी कार्सच्या भारतातील सर्वात मोठ्या कारखान्यात ‘एएमजी श्रेणी’ची गाडी स्थानिक स्तरावर उत्पादित करणे ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.’’ अरोरा म्हणाले, ‘मेड इन इंडिया’ ‘एएमजी जीएलसी ४३ फोरमॅटिक कूपे’चे उत्पादन भारतात सुरू करून, आम्ही भारतीय ग्राहकांना दिलेले, जागतिक दर्जाच्या वाहनांमध्ये महत्त्वपूर्ण स्थानिक मूल्यवर्धन कमीतकमी वेळेत करण्याविषयीचे वचन पाळत आहोत.

हेही वाचा : पीएमपीच्या ६० टक्के बस मार्गांवर; रोजचे एवढे प्रवासी करतात प्रवास

या नव्या गाडीत अभिजातपणा, स्पोर्टस कारची गतिशीलता आणि मर्सिडीज-बेंझ जीएलसीची बहुमुखी प्रतिभा यांचे अनोखे मिश्रण  आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
३.० लिटरचे ‘व्ही-६ बायटर्बो’ इंजिन आता ३९० एचपी (२८७ किलोवॅट) इतकी शक्ती देते. मागील मॉडेलपेक्षा ही शक्ती २३ एचपीने (१७ किलोवॅट) जास्त आहे. या गाडीची किंमत ७६.७० लाख रूपये (एक्‍स-शोरूम) आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakan now production a new Mercedes-Benz model

Tags
टॉपिकस
Topic Tags: