चंदा कोचर यांची स्वतंत्र चौकशी होणार

पीटीआय
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - व्हिडिओकॉन प्रकरणी आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली. ‘स्वतंत्र व विश्‍वासार्ह’ व्यक्तींच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही चौकशी होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

व्हिडीओकॉन समूह तसेच नूपॉवर कंपनीला २०१२ मध्ये बॅंकेने तीन हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे नूपॉवरचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाची ६४ कोटी रुपयांची गुंतणूक आहे. पतीशी संबंधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर होत आहे. 

Web Title: chanda kochhar independent inquiry