चिकन आणि अंड्यांच्या किमती पोहोचल्या चंद्रावर; का वाढतायत या किमती?

chicken
chickenchicken

गेल्या वर्षी कोरोनामुळे पसरलेल्या अफवांनी आणि आलेल्या बर्ड फ्लू च्या बातम्यांमुळे पोल्ट्री व्यवसायाला पूर्णतः झोपवून टाकलेलं. मात्र सध्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली पाहायला मिळतेय. पोल्ट्री व्यवसाय सध्या नवनवीन उच्चांक गाठताना पाहायला मिळतोय. मागील काही दिवसांमध्ये चिकनच्या किमती तब्बल २०० ते २२० रुपयांवर गेल्याच पाहायला मिळतंय. गेल्यावर्षी याच किमती अगदी १३० रुपये ते १५० रुपये इतक्या खाली आल्याचं आपण पाहिलंय. वाढलेल्या किमतीचं मुख्य कारण ठरतंय कोकबड्यांच्या सरासरी किमतीत झालेली वाढ. जूनमध्ये कोंबडीची सरासरी 'फार्म गेट किंमत '95 रुपये प्रति किलोवरून वाढून 120 रुपये प्रति किलो झाली आहे.

गेट फार्म किमती म्हणजे ज्या किमतीवर कुक्कुटपालक शेतकरी त्यांचे बाजारात विकण्यासाठी तयार असे २ ते अडीच किलो वजनाचे पक्षी विकतात. गेल्या काही आठवड्यांमध्ये, कोंबड्यांच्या याच फार्म गेट किमतींमध्ये चांगली वाढ झाल्याचं किमती पाहायला मिळालं आहे. देशभरात या किमतींनी १२० रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे.

chicken
मायक्रोसॉफ्ट Oyo मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत

कुठे कशा किमती

देशाच्या राजधानी दिल्लीबद्दल बोलाल तर राजधानीमध्ये ड्रेस्ड चिकनची किरकोळ बाजारातील किंमत सुमारे 210 रुपये प्रति किलो आहे. आर्थिक राजधानीबद्दल बोलाल तर मुंबईच्या बाजारात ड्रेस्ड चिकनची किंमत २२० ते २३० रुपये प्रति किलो आहे. गेल्या वर्षी दिल्लीत ड्रेस्ड चिकनची किंमत सुमारे 160-170 रुपये किलो होती. तर देशभरात इतर ठिकाणी हीच किंमत १३० ते १५० रुपये प्रति किलो इतकी होती.

महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळ्यात कोंबडीच्या अंड्यांच्या किमतीमध्ये अचानक वाढ दिसून येत नाही. मात्र यंदा कोंबडीच्या अंड्यांच्या किमतीमध्ये देखील चांगली वाढ होताना पाहायला मिळतं आहे.

का वाढतायत चिकनच्या किमती ?

याबाबत काही कुकूटपालक शेतकऱ्यांची चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. कोंबड्याना देण्यात येणाऱ्या खुराक च्या किमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतेय. यामध्ये महत्त्वाचा खुराक मानल्या जाणाऱ्या सोया केक आणि मक्याच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचं पंपहायाला मिळालं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत सोयाचे दर प्रति किलो ३५ रुपयांवरून तब्बल ७६ रुपयांवर गेले आहेत. तर दुरीकडे मक्याची किंमत देखील एका वर्षात १४ रुपये प्रति किलो वरून तब्बल २० रुपये किलो झाली आहे. अशातच वाढत्या कितींमुळे उत्पादन कमी आणि किमती वाढताना पाहायला मिळत असल्याचं कुकूटपालक व्यावसायिक म्हणतायत.

chicken
IPOचे प्रकार कोणते, कशी करायची गुंतवणूक?

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम

गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांकडून तसेच डायटिशियन्स कडून सातत्याने आपल्या आहारात चिकनचा वापर करण्यास सांगितलं जातंय. चिकन आणि अंडी यांमुळे शरीराला पोषक घटक मिळतात. चिकन आणि अंड्यांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असं देखील डॉक्टर्स सांगतात. अशात ग्राहकांनी देखील आपल्या आहारात चिकन आणि अंड्यांचा आहार वाढवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकीकडे वाढती मागणी आणि दुसरीकडे कमी उत्पादन, ही बाब देखील चिकनच्या वाढत्या किमतींसाठी कारणीभूत ठरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

कधीपर्यंत असेच राहतील चिकनचे दर

जोपर्यंत कुकुटपालन व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी होत नाहीत तोवर चिकनच्या किमती चढ्याच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशात कुकूटपालक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे सोयाबीनच्या किमती कमी होऊन कुकूटपालक शेतकऱ्यांना लागणार 'लागत' खर्च कमी होईल. कारण वाढत्या महागाईच्या काळात चिकनच्या किमती अशाच चढत्या राहिल्यात तर ग्राहक महागड्या चिकन आणि अंड्यांकडे पाठ फारवेळ अशी भीती कुकूटपालक शेतकऱ्यांना वाटत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com