देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम पायउतार

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली. अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला होता. परंतु, सरकारनं त्यांचा एक वर्षाचा कालावधी वाढवला होता. 

जेटली यांनी 'थँक यू अरविंद' या मथळ्याखाली फेसबुकवर ब्लॉग पोस्ट केला आहे. ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी अरविंद अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकेला माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या समोर पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी दिलेल्या सेवेबाबत त्यांचे आभार देखील मानले आहेत. ऑक्टोबरमध्ये ते अमेरिकेत जाणार आहेत, असं त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. मूत्रपिंडाच्या ऑपेरेशनमुळे सुट्टीवर असलेले अरुण जेटली गेले काही दिवस फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक विषयांवर भाष्य करत आहेत. 

अरविंद सुब्रमण्यम हे दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजचे पदवीधर असून आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठामधून त्यांनी डॉक्टरेट केली आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून काम पहिले आहे. त्यांचा भारतीय आणि चीनच्या अर्थव्यवस्थेचा गाढा अभ्यास आहे.  

यावर्षीचा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना नेहमीच रटाळपणा टाळून तो वाचकांसाठी आकर्षक करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वचनांचा आधार घेतला होता. त्याचे देशाने कौतुकही केले होते. 

Web Title: Chief Economic Advisor Arvind Subramanian to resign