चीनची भारतातील गुंतवणूक टांगणीला

वृत्तसंस्था
Thursday, 25 June 2020

भारत आणि चीन यांच्यातील गलवान खोऱ्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर अभियानाला बळ देण्यासाठी स्वदेशी वस्तूंवर भर दिला जाणार असून, चिनी कंपन्यांच्या वस्तूंची आयात थांबवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यातील गलवान खोऱ्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर अभियानाला बळ देण्यासाठी स्वदेशी वस्तूंवर भर दिला जाणार असून, चिनी कंपन्यांच्या वस्तूंची आयात थांबवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा स्थितीत चिनी कंपन्यांनी भारतीय स्टार्टअप कंपन्यांतील गुंतवणुकीलाही धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य सेवा, स्टार्टअप कंपनी, मोबाइल गेमिंग, शिक्षण, वित्तसेवा, परिवहन सेवा आदी क्षेत्रातील गुंतवणूक असून त्यात पेटीएम, बायजू आणि ओला कंपन्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

Image may contain: text

चीन कंपन्यांची भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक
अलिबाबा : झोमॅटो, हेलोफाय, टिकिटनाऊ, रॅपिडो, व्हिडोली, एक्स्प्रेसबिस
टेन्सेंट : फ्लिपकार्ट, हाइक, उडान, नियो, गाना, डाउटनट, खट्टाबूक, एमएक्स प्लेअर, पाइन लॅब्स, पॉकेट एफएम, प्राक्टो

Image may contain: text

ठळक बाबी

  • इंडियन कौन्सिल ऑन ग्लोबल रिलेशन्सशी निगडीत एक थिंक टँक गेट वे हाऊसने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार भारतीय स्टार्टअप्समध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या चिनी कंपन्यांची मार्च २०२० अखेरपर्यंत सुमारे ४ अब्ज डॉलर गुंतवणूक. 
  • २०१५ पासून चीनच्या दहा आघाडीच्या कंपन्यांची भारतातील विविध क्षेत्रातील ३१ स्टार्टअपमध्ये गुंतवणूक 
  • शाओमी : हंगामा, शेअरचॅट, रॅपिडो, झेस्टमनी, ओयो, रिक्शॉ, सिटी मॉल, मार्सप्ले इंटरनेट

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinas investment in India hangs in the balance